बातम्या

"कागल बस स्थानकावर आरपीआय आठवले गटाच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त दूध वाटप आणि विविध उपक्रम"

Ramdaas athavle


By nisha patil - 12/26/2024 2:49:29 PM
Share This News:



कागल : प्रतिनिधी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कागल बस स्थानक येथे कागल तालुका रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दूध वाटप करण्यात आले.

      नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कागल बस स्थानक येथे आरपीआय आठवले गट जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तसेच कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या हस्ते दुधाचे वाटप करण्यात आले. बस स्थानकमधील प्रवासी, विद्यार्थी, शहरवासीय यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. तसेच स्वर्गीय गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय,येथे मुलांना स्नेहभोजन देणेत आले.कागल ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले.

        या कार्यक्रमास मंगलराव माळगे, बी आर कांबळे, सचिन मोहिते, अण्णासो आवळे, सातापा हेगडे, कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे ,जयवंत हळदीकर, तानाजी सोनाळकर ,उत्तम साकेकर, मंजुनाथ वराळे ,उदय कांबळे, दिनेश मळगेकर, किरण सिध्दनेर्लीकर अजित भोसले, उदय कांबळे, सौरभ कांबळे, एम.डी.साकेकर, विठ्ठल नांध्यालकर,यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


"कागल बस स्थानकावर आरपीआय आठवले गटाच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त दूध वाटप आणि विविध उपक्रम"
Total Views: 55