राजकीय
रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका...
By nisha patil - 11/28/2024 7:49:27 PM
Share This News:
रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका...
"उद्धव ठाकरे एक दिवस देश सोडून जातील"
शिर्डी, 28 नोव्हेंबर 2024 - शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. "एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडून जातील," असे खळबळजनक विधान कदम यांनी केले.
शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीपासून वेगळा होणार, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या चर्चांवर भाष्य करताना कदम यांनी हे विधान केले. "ठाकरे गटाचा पराभव जवळ आला आहे. त्यांच्याकडे आता फक्त स्वतःची फॅमिली उरली आहे. यामुळे ते एक दिवस देश सोडून जातील," असे ते म्हणाले.
रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका...
|