बातम्या

8 मार्चला रामदेव बाबा कोल्हापुरात...

Ramdev Baba in Kolhapur on March 8


By nisha patil - 2/28/2025 8:52:14 PM
Share This News:



8 मार्चला रामदेव बाबा कोल्हापुरात...

महिला दिनानिमित्त कुंकूमार्चन बरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

महिला पतंजली योग समितीच्या वतीने 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन गांधी मैदान येथे करण्यात येणार आहे. करवीर निवासीनी अंबाबाईच्या चरणी कुंकुमार्चनाने याची सुरुवात सकाळी 9 वाजता होणार आहे.

महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी परमपूज्य स्वामी रामदेव जी महाराज व पूज्य साध्वी देवप्रियाजी हेआरोग्य निरोगी राहण्यासाठी  भारतीय संस्कृती , भारतीय शिक्षण पद्धती अशा विविध गोष्टींवर मार्गदर्शन करणार आहेत.


8 मार्चला रामदेव बाबा कोल्हापुरात...
Total Views: 99