बातम्या

रूकडी गावचे सुपुत्र रमेश कांबळे यांची शिवसेना (शिंदे गट) हातकणंगले तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

Ramesh Kamble son of Rookdi village appointed


By nisha patil - 2/25/2025 11:55:13 PM
Share This News:



रूकडी गावचे सुपुत्र रमेश कांबळे यांची शिवसेना (शिंदे गट) हातकणंगले तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

कोल्हापूर (अमर आठवले) : रुकडी गावचे सुपुत्र आणि बौद्ध समाजाचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे रमेश आण्णाप्पा कांबळे यांची शिवसेना (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) हातकणंगले तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने आणि उपजिल्हाप्रमुख अविनाश बणगे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

या वेळी माले डेप्युटी सरपंच सुनिल कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य शशुपाल कुरणे, तसेच अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश कांबळे आणि अविनाश बणगे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे स्वागत केले, तर जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचे स्वागत शशुपाल कुरणे यांनी केले.

रुकडी, माले, चोके, हेरले या भागातील शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याला हजेरी लावली. रमेश कांबळे यांच्या निवडीमुळे हातकणंगले तालुक्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


रूकडी गावचे सुपुत्र रमेश कांबळे यांची शिवसेना (शिंदे गट) हातकणंगले तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
Total Views: 64