बातम्या

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भवानी मंडपात ग्राहक जनजागृतीपर स्टॉलचे उद्घाटन

Rashtriy graham din


By nisha patil - 12/24/2024 9:22:05 PM
Share This News:



  *कोल्हापूर, * : वस्तू अथवा सेवा घेत असताना कोणत्याही प्रकारे एक ग्राहक म्हणून आपली फसवणूक होणार नाही, याबाबत प्रत्येक ग्राहकाने आपल्या हक्कांबाबत अधिक सजग व्हावे, असे आवाहन    प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना नष्टे यांनी केले.


      ग्राहकांच्या अधिकाराचे संरक्षण, त्यांचे कर्तव्य, त्यांच्या हक्कासाठी जागरूकता वाढविण्यासाठी भवानी मंडप परिसरात ग्राहक जनजागृतीपर स्टॉलचे आयोजन केले होते.

यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त उदय लोहकरे,  करवीरचे प्रभारी तहसीलदार विजय जाधव, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने, करवीरचे पुरवठा निरीक्षक अधिकारी विकास देसाई, पुरवठा निरीक्षक भाऊसाहेब खोत, नम्रता कुडाळकर, महेश काटकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष बी. जी पाटील, ग्राहक कल्याण जिल्हाध्यक्ष अरुण यादव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष ॲड सुप्रिया दळवी, ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष जगदीश पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष कमलाकर बुरांडे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अध्यक्ष महावीर खोत, आदी उपस्थित होते.

   श्रीमती नष्टे म्हणाल्या, केंद्र सरकारच्या वतीने 24 डिसेंबर  रोजी राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात येतो.  हा दिवस भारतीय ग्राहकांच्या अधिकाराबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी विशेष महत्त्वाचा आहे. 24 डिसेंबर दिवशी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 लागू झाला. या कायद्याने ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी एक मजबूत कायदेशीर रचना उपलब्ध केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष प्रवीण महावीर म्हणाले, ग्राहाकांमध्ये जागृतता वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, जेणेकरुन ग्राहकांना आपले अधिकार व कर्तव्यासंबंधी चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकेल. 
 

सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन उदय लोहकरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी मानले.


राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भवानी मंडपात ग्राहक जनजागृतीपर स्टॉलचे उद्घाटन
Total Views: 45