बातम्या
कोल्हापुरात निवासी फुटबॉल केंद्र पुन्हा सुरू करा; फुटबॉल प्रेमींची मागणी
By nisha patil - 3/7/2024 1:23:06 PM
Share This News:
कोल्हापुरात छत्रपती राजाराम महाराजांनी फुटबॉलला राजाश्रय दिला. त्यानंतर आजतागायत कुस्ती सोबत फुटबॉल खेळालाही स्थानिकांच्या हृदयात स्थान आहे.शाहू स्टेडियमवर फुटबॉल सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते.16 जुलै 1996 साली तत्कालीन सरकारन कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनी मध्ये कुस्ती आणि फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रास मंजूरी दिली.त्यांनतर काही काळ हे प्रशिक्षण केंद्र शिवाजी स्टेडियमवर सुरू होत. मात्र आता क्रीडा व युवा सेवा संघ संचालनालयाने ते पुण्याला हलवीण्याचा घाट धरला.याच्या निषेधार्थ आज फुटबॉल प्रेमींच्या वतीने शहरातील मिरजकर टिकती चौकात निदर्शन करण्यात आली.यावेळी फुटबॉल प्रेमींनी जोरदार घोषणाबाजी करत हे केंद्र कोल्हापूर बाहेर हलविण्याच्या निर्णयाचा निषेध केला.
दरम्यान हे फुटबॉल केंद्र कोल्हापुरात पूर्ववत चालू करा व अन्यथा महाराष्ट्र शासनाविरोधात उग्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी फुटबॉल प्रेमींच्या वतीन दिला.
कोल्हापुरात निवासी फुटबॉल केंद्र पुन्हा सुरू करा; फुटबॉल प्रेमींची मागणी
|