व्यवसाय
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ: खरेदीसाठी ग्राहकांची उत्सुकता शिगेला
By nisha patil - 2/4/2025 3:22:03 PM
Share This News:
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ: खरेदीसाठी ग्राहकांची उत्सुकता शिगेला
दोन दिवसांत सोन्याचा दर तब्बल 2,200 रुपयांनी वाढला
सोन्याचा दर लवकरच एक लाख रुपये प्रति तोळा पार करण्याची शक्यता
गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये सोने खरेदी करण्याची मोठी उत्सुकता दिसून येतेय. त्याचबरोबर सोन्या-चांदीच्या दरातही विक्रमी वाढ झालेली पाहायला मिळते.
सोमवारी कोल्हापूर सराफ बाजारात दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 93,800 रुपये वर पोहोचला. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच, म्हणजेच 30 मार्च रोजी हा दर 91,600 रुपये इतका होता. याचा अर्थ केवळ दोनच दिवसांत सोन्याचा दर तब्बल 2,200 रुपयांनी वाढला आहे.
फक्त सोनेच नाही, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एका किलो चांदीचा दर आता 1,0२,500 रुपयांवर पोहोचलाय. वाढत्या मागणीमुळे येत्या काही दिवसांत सोन्याचा दर एक लाख रुपये प्रति तोळा पार करू शकतो, असा अंदाज आहे.
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ: खरेदीसाठी ग्राहकांची उत्सुकता शिगेला
|