बातम्या

रिल स्टार सूरज चव्हाण याची बिग बॉस मराठी मध्ये एंट्री

Reel star Suraj Chauhan in big boss entry


By nisha patil - 7/29/2024 4:52:39 PM
Share This News:



बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये कोण स्पर्धक म्हणून येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर यावरुन पडदा उठला आहे.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये 16 स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे, यामध्ये अभिनेते, रिल स्टार, गायक आणि पुढारी यांची एन्ट्री झाली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात रिल स्टार सूरज चव्हाणची एन्ट्री झाली आहे. गुलीगत धोका म्हणत टिकटॉक आणि रिल्सवर ज्याने धुमाकूळ घातला असा हा पठ्ठ्या बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात सगळ्यांना गुलीगत चीत करायला पोहोचला आहे.

आजपासून पुढील 100 दिवस स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.बिग बॉसच्या घरात रिल स्टार सूरज चव्हाण याच्यासोबत अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, पंढीरानाथ कांबळे उर्फ पॅडी, अभिजीत सावंत यांनी एन्ट्री घेतली आहे. दरम्यान एन्ट्रीच्या वेळी स्पर्धकांना दोन पर्याय देण्यात आले.

बिग बॉसची करन्सी किंवा एक पावर कार्ड असा ऑप्शन देण्यात आलाय. त्यामध्ये अनेकांनी पॉवर कार्डची निवड केली तर काहींनी करन्सी घेतली. त्यामुळे आता खेळात चांगलीच रंगत येणार असल्याचं पाहायला मिळतंय.


रिल स्टार सूरज चव्हाण याची बिग बॉस मराठी मध्ये एंट्री