बातम्या
कोल्हापुरातील सर्व गणेश उत्सव मंडळांसाठी दिलासा
By nisha patil - 8/31/2024 11:58:12 PM
Share This News:
कोल्हापुरातील सर्व गणेश उत्सव मंडळांसाठी दिलासा
महापालिकेकडून आकारण्यात येणारी खड्डे पावती रद्द
गणेशोत्सवासाठी जे मंडप उभारले जातात त्यांच्या परवानगीवेळी महापालिकेकडून खड्डा पावती घेतली जात होती.
जे मंडळ खड्डा न खोदता मंडप उभारत होते त्यांनाही या पावतीचा भुर्दंड लागत होता.
या धोरणाच्या विरोधात 'आप'च्या टीमने मा. संदीप देसाई यांच्या नेतृत्वात आवाज उठवून महानगरपालिका प्रशासनाला खड्डा पावती रद्द करण्यास भाग पाडले.
याबाबत संबंधित महापालिकेकडून विभागीय कार्यालय तसेच एक खिडकी परवानगी अधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश जारी केले आहेत.
त्यामुळे ज्या मंडळांनी खड्डा न पाडता मांडव उभा केलेला आहे त्यांनी खड्डा पावती भरू नये ही विनंती.
'आप'लाच
संदीप देसाई
प्रदेश संघटक
आम आदमी पार्टी महाराष्ट्र
कोल्हापुरातील सर्व गणेश उत्सव मंडळांसाठी दिलासा
|