बातम्या

कोल्हापूरकरांना दिलासा.. प्रॉपर्टी कार्ड वाटपाला गती देण्याचे आमदार अमल महाडिक यांचे निर्देश

Relief to the people of Kolhapur


By nisha patil - 2/1/2025 9:42:52 PM
Share This News:



कोल्हापूर शहराच्या उपनगरातील अनेक मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या संदर्भात आमदार अमल महाडिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली.

या बैठकीत आमदार महाडिक यांनी महानगरपालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या सर्व मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना केली. नगर भूमापन करण्यासाठी आवश्यक अधिसूचना यापूर्वीच मंजूर झाली असून कोल्हापूर महानगरपालिकेने मोजणी फी भरण्यासंदर्भात अंदाजपत्रकात तरतूद करावी अशी सूचना आमदार महाडिक यांनी अतिरिक्त आयुक्त रोकडे यांना केली. भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षकांनी दिलेल्या प्रस्तावाला महापालिका प्रशासनाने तात्काळ मान्यता देऊन आवश्यक निधी पैकी काही रक्कम एक महिन्याच्या आत वर्ग करावी असे निर्देश आमदार महाडिक यांनी दिले तसेच भूमी अभिलेख विभागाने निविदा प्रक्रिया सुरू करणेबाबत निर्देश दिले.

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा बावडा,कसबा करवीर, टेंबलाईवाडी, कळंबे तर्फ ठाणे, उजळईवाडी आणि नवे बालिंगे अशा सहा गावातील एकूण 937 सर्वे क्रमांक आणि 1782.50 हेक्टर क्षेत्राची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत वर्ष अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे अशा सूचना आमदार महाडिक यांनी अधीक्षकांना दिल्या.
.


कोल्हापूरकरांना दिलासा.. प्रॉपर्टी कार्ड वाटपाला गती देण्याचे आमदार अमल महाडिक यांचे निर्देश
Total Views: 33