बातम्या

अंबाई टॅंकची दुरुस्ती करा. आपची मागणी.

Repair the Ambai tank


By nisha patil - 3/14/2025 10:02:09 PM
Share This News:



अंबाई टॅंकची दुरुस्ती करा. आपची मागणी.

महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी आपची चर्चा

कोल्हापूर महापालिकेचा अंबाई जलतरण तलाव गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. उखडलेल्या फरश्या, पाण्याची गळती, जीर्ण झालेला डायविंग टॉवर, फिल्टरेशन अभावी हिरवेगार होत असलेल्या पाण्याने तलावाची अवस्था बिकट बनली आहे. त्यामुळे या टॅंकची दुरुस्ती होऊन तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज आम आदमी पार्टीने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले.

यावर अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी शहर अभियंता व इस्टेट विभाग आवश्यक सूचना देऊन कामास सुरुवात करणार असल्याचे सांगितले.यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, रमेश कोळी, लखन मोहिते आदी उपस्थित होते.


अंबाई टॅंकची दुरुस्ती करा. आपची मागणी.
Total Views: 31