ताज्या बातम्या
सायकल चालवा पृथ्वी वाचवा : डॉ. जगन्नाथ पाटील
By nisha patil - 1/3/2025 8:45:44 PM
Share This News:
सायकल चालवा पृथ्वी वाचवा : डॉ. जगन्नाथ पाटील
शहीद महाविद्यालयात विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप
सायकल वाटप हा उपक्रम केवळ विद्यार्थिनींच्या सोयीसाठी नसून, पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्याचा महत्त्वाचा संदेश देतो. भविष्यात अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्याचा महाविद्यालयाचा संकल्प आहे. सायकल चालवा देश वाचवा असे मत शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी केले.
शहीद महाविद्यालयात पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबन या उद्देशाने मीनाक्षी पाटोळे आणि सानिका पाटोळे या विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. हे वाटप प्रतिनिधिक असून शहीद शिक्षण प्रसारक मंडळांने या वर्षभरामध्ये 100 विद्यार्थिनींना मोफत सायकल देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाद्वारे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यास हातभार लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या विद्यार्थीनी महाविद्यालयास सायकल वरून येतील. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायकल चालवा पृथ्वी वाचवा : डॉ. जगन्नाथ पाटील
|