बातम्या

महाराष्ट्रात ‘सेवा हक्क कायदा’ लागू; 43 सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध

Right to Service Act implemented in Maharashtra


By nisha patil - 6/3/2025 7:20:05 PM
Share This News:



महाराष्ट्रात ‘सेवा हक्क कायदा’ लागू; 43 सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध

मुंबई, ६ मार्च २०२५: महाराष्ट्रात आजपासून ‘सेवा हक्क कायदा’ लागू झाला असून, नागरिकांना जन्म प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, परवाना नोंदणी यांसह ४३ सरकारी सेवा घरबसल्या ऑनलाईन मिळणार आहेत.

सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर (www.aaplesarkar.maharashtra.gov.in) अर्ज करावा लागेल. कायद्यानुसार, निश्चित कालमर्यादेत सेवा पुरवणे बंधनकारक असून, विलंब किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना ₹५०० ते ₹५,००० पर्यंत दंड होऊ शकतो.

सध्या ४३ सेवा उपलब्ध असून, मार्च २०२६ पर्यंत ही संख्या १३५ वर जाणार आहे. महसूल, ग्रामविकास, कामगार, जलसंपदा, वनविभाग यांसह विविध विभागांचा यात समावेश आहे. या कायद्यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयांत चकरा मारण्याची गरज भासणार नाही, वेळ आणि श्रम वाचणार आहेत.


महाराष्ट्रात ‘सेवा हक्क कायदा’ लागू; 43 सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध
Total Views: 31