बातम्या

दावत नगर, कबनूर येथील रस्त्याच्या उद्घाटनाचा सोहळा

Road Inauguration Ceremony at Dawat Nagar


By nisha patil - 10/14/2024 9:26:06 PM
Share This News:



कार्यसम्राट आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे १०० लाख रुपयांच्या निधीतून दावत नगर, कबनूर येथील रस्त्याचे काम संपन्न झाले. या कामाचा भव्य उद्घाटन व लोकार्पण सोहळा डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते पार पडला.

समारंभात भागातील नागरिकांनी साहेबांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. यावेळी कबनूर गावचे प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने नागरिक व महिलांची उपस्थिती होती.


दावत नगर, कबनूर येथील रस्त्याच्या उद्घाटनाचा सोहळा