बातम्या
हत्ती चौक, इचलकरंजीतील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते
By nisha patil - 1/18/2025 3:09:09 PM
Share This News:
हत्ती चौक, इचलकरंजीतील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते
आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हत्ती चौक, इचलकरंजी परिसरातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपल्या भाषणातून या कामाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि गावाच्या विकासासाठी यासारख्या प्रकल्पांचे योगदान अधोरेखित केले.
आमदार डॉ. राहुल प्रकाश प्रकाश आवाडे साहेब यांनी विकास कामांबाबत आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की "रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासकामे ही ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाची आहेत. हा प्रकल्प म्हणजे हत्ती चौक परिसरातील ग्रामस्थांना आधुनिक व सुगम प्रवासाची भेट आहे."
यावेळी महावीर जैन, अनिल कांबळे श्रीशैल्य कित्तुरे, गजानन मेटे, अभिषेक पाटील, दत्ता टेके, राजू शेंडगे, मालसाकांत कवडे, विशाल मुसळे, गणेश मुसळे, संजय जाधव, बंडोपंत सातपुते, दत्ता कित्तुरे, सचिन सुतार, महावीर कुरुंदवाडे, महावीर अमर बुचडे, ज्ञानू उरणे, पोपट सातपुते, रनजीत सावंत, भागवत, अनिल दवंडे, हसन यांच्यासह हत्ती चौकातील प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.a
हत्ती चौक, इचलकरंजीतील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते
|