बातम्या
ऐनापुर येथे रस्ता काम उद्घाटन...
By Administrator - 11/12/2024 4:17:14 PM
Share This News:
ऐनापुर येथे रस्ता काम उद्घाटन...
खा. धनंजय महाडिक यांच्या निधीतून तालुक्यातील विकास कार्याला गती : बाळ पोटे
गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापुर येथे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष श्री बाळ उर्फ माधव पोटे-पाटील, सरपंच उषाताई मांगले, उपसरपंच लहुकुमार दड्डीकर, गडहिंग्लज युवाशक्ती प्रमुख विजय फुटाणे, माजी उपसरपंच पिंटू मांगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी श्री बाळ पोटे-पाटील यांनी खासदार महाडिक यांच्या निधीतून गडहिंग्लज तालुक्यातील प्रत्येक गावात विकासकामे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी पिंटू मांगले यांनी निधी मिळवण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक श्री विष्णू देसाई यांच्या हस्ते बाळ पोटे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच उषाताई मांगले, ग्रामसेवक धनवडे मॅडम, आणि अन्य मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐनापुर येथे रस्ता काम उद्घाटन...
|