बातम्या
नियमांचे प्रत्येकाने पालन करायला हवे : अमोल येडगे
By nisha patil - 1/23/2025 6:17:17 PM
Share This News:
कोल्हापूर रस्त्यावरील अपघातात वेळेत मदत केल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. यासाठी रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला लगेच दवाखान्यात उपचार मिळवून देणाऱ्या व्यक्तीला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणार, असे जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी सांगितले. कोल्हापूर व डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग व पॉलिटेक्नीक कॉलेजतर्फे कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, 'आपण वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतो. रस्ते अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. यासाठी रस्ता सुरक्षेच्या नियमांची माहिती घेण्याबरोबरच या नियमांचे प्रत्येकाने पालन करायला हवे. हेल्मेटचा वापर करा. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा. चारचाकी वाहनात सीट बेल्ट लावा. वेगावर नियंत्रण ठेवा.यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने, गोविंदा नंद उपस्थित होते.
नियमांचे प्रत्येकाने पालन करायला हवे : अमोल येडगे
|