बातम्या
अघोरी साधूच्या प्रेमात रशियन महिला..
By nisha patil - 1/31/2025 7:46:28 PM
Share This News:
अघोरी साधूच्या प्रेमात रशियन महिला..
भारतातच राहण्याचा घेतला निर्णय!
भारताच्या आध्यात्मिक वातावरणाने आणि एका अघोरी साधूच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेल्या रशियातील एका महिलेने प्रेमाच्या बंधनात अडकून भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पर्यटनासाठी भारतात आलेली ही महिला एका अघोरी साधूच्या संपर्कात आली. काही दिवसांतच त्यांच्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. आता तिने रशिया सोडून भारतातच नव्या जीवनाची सुरुवात केली आहे. या प्रेमकथेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यांच्या अनोख्या प्रेमकथेची जोरदार चर्चा सुरू आहे.
अघोरी साधूच्या प्रेमात रशियन महिला..
|