बातम्या

ऋतुराज पाटील फाउंडेशनच्यावतीने* *पूरग्रस्तांना कोरड्या खाद्यपदार्थांचे वाटप

Ruturaj patil Fondation


By nisha patil - 7/29/2024 8:28:01 PM
Share This News:



*ऋतुराज पाटील फाउंडेशनच्यावतीने*

*पूरग्रस्तांना कोरड्या खाद्यपदार्थांचे  वाटप*

-संकट गंभीर तितकीच आमची युवा पिढी खंबीर - आमदार ऋतुराज पाटील
-16 निवारा केंद्रांमधील हजार 81 पूरबाधिताना मदतीचा हात

संकट गंभीर तितकीच आमची युवा पिढी खंबीर आहे. पूर परिस्थितीच्या वेळी  ऋतुराज पाटील फाउंडेशनचे सर्व सहकारी मदतीसाठी नेहमीच तत्पर आहेत,  असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. ऋतुराज पाटील फाउंडेशनच्यावतीने आमदार पाटील यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

    जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरीकांसाठी महानगरपालिकेकडून शहरात 16 निवारा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. निवारा केंद्रामधील 1 हजार 81 पूर बाधित नागरिकांना ऋतुराज पाटील फाउंडेशनच्यावतीने कोरडे खाद्यपदार्थ  वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले. आमदार ऋतुराज पाटील यांनी जाधववाडी, शाहू विद्यालय येथील निवारा केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यानी यावेळी दिला.  पावसाचा जोर कमी होऊन पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे दैनंदिन जीवन लवकरच सुरळीत होईल, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.

  तत्पूर्वी, अजिंक्यतारा कार्यालय येथे झालेल्या संवाद बैठकीत आमदार ऋतुराज पाटील 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुराच्या काळात देखील फाउंडेशनच्या वतीने मदत कार्य राबवण्यात आले होते. यावर्षीहीच्या उपक्रमात सहभागी होऊन फौंडेशनच्या युवा सहकाऱ्यांनी दिलेले पाठबळ नेहमीच समाजासाठी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देईल.


ऋतुराज पाटील फाउंडेशनच्यावतीने* *पूरग्रस्तांना कोरड्या खाद्यपदार्थांचे वाटप