बातम्या
परभणी घटनेची एसआयटी चौकशी करा - आम आदमी पार्टीची मागणी
By nisha patil - 12/12/2024 11:13:45 PM
Share This News:
परभणी घटनेची एसआयटी चौकशी करा - आम आदमी पार्टीची मागणी
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील प्रतीकात्मक संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड झाल्याच्या घटनेची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संविधानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
तहसीलदार स्वप्नील पवार यांना निवेदन देताना आप पदाधिकाऱ्यांनी घटनेचे तीव्र शब्दांत निषेध केला. निवेदनात म्हटले आहे की, संविधानाची विटंबना करणारी ही घटना अत्यंत लाजिरवाणी असून, दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. यासाठी एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी.
याशिवाय, संविधानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने शाळा, कॉलेज, व समाजातील विविध स्तरांमध्ये कार्यक्रम आयोजित करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या वेळी आपचे शहर सचिव समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, रमेश कोळी, विवेक भालेराव, संजय नलवडे, आणि अजित पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
परभणी घटनेची एसआयटी चौकशी करा - आम आदमी पार्टीची मागणी
|