विशेष बातम्या

सचिन तेंडुलकर कुटुंबासह कोल्हापुरात; दत्त आणि अंबाबाई दर्शनाचा योग

Sachin Tendulkar with family in Kolhapur


By nisha patil - 2/19/2025 12:50:02 PM
Share This News:



सचिन तेंडुलकर कुटुंबासह कोल्हापुरात; दत्त आणि अंबाबाई दर्शनाचा योग

कोल्हापूर : भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांचे कुटुंब आज कोल्हापुरात दाखल झाले आहे. त्यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा हे सकाळी कोल्हापूर विमानतळावर पोहोचले. यावेळी उद्योजक तेज घाटगे यांनी त्यांचे विशेष स्वागत केले.

सचिन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी नरसिंहवाडीत श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त आणि चाहत्यांनी गर्दी केली होती. आता त्यांच्या संपूर्ण कुटुंबानेही कोल्हापूरला भेट दिली असून, सकाळीच मुंबईहून विमानाने आगमन झाल्यानंतर तिघेही नरसिंहवाडीला रवाना झाले.

सायंकाळी तेंडुलकर कुटुंब पुन्हा कोल्हापुरात परतणार असून, महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेण्याची शक्यता आहे. सचिन यांच्या आगमनाने कोल्हापुरातील चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

(अधिक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा!)


सचिन तेंडुलकर कुटुंबासह कोल्हापुरात; दत्त आणि अंबाबाई दर्शनाचा योग
Total Views: 103