विशेष बातम्या
सचिनचा ग्रेटनेस, धोनीचा दृष्टिकोन – सुनंदन लेले यांचा संवाद
By nisha patil - 12/2/2025 10:48:35 PM
Share This News:
सचिनचा ग्रेटनेस, धोनीचा दृष्टिकोन – सुनंदन लेले यांचा संवाद
कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सचिन तेंडुलकरच्या महानतेचा प्रवास, धोनीचा संयम, विराट-रोहितची शिस्त आणि जसप्रीत बुमराचा संघर्ष यावर प्रकाश टाकला.
लेले म्हणाले, "क्रिकेटमध्ये यश सहज मिळत नाही; मेहनत, वेळ आणि संयम महत्त्वाचा आहे." सचिनने वडिलांच्या निधनानंतर अश्रू लपवण्यासाठी गॉगल घातला होता, हे सांगताना त्यांनी भावनिक आठवणींना उजाळा दिला.
"आजच्या पिढीने सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्ष जीवनाकडे लक्ष द्यावे," असा सल्लाही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
सचिनचा ग्रेटनेस, धोनीचा दृष्टिकोन – सुनंदन लेले यांचा संवाद
|