बातम्या

साई दर्शन जनता क्रेडिट सोसायटी प्रकरणी पोलीस प्रशासनाचा सामान्य जनतेवर अन्याय

Sai Darshan janta credit sosaiti


By nisha patil - 6/8/2024 9:03:01 PM
Share This News:



हजारो लोकांना कर्जाचे अमिष दाखवत साई दर्शन जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड रंकाळा या क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शुभम कृष्णात देशमुख व संपूर्ण संचालक मंडळ यांनी आर्थिक अडचणीत असलेल्या गरजू लोकांना कर्जाच्या अमिषा पोटी कोट्यावधी रुपयाचा गंडा  घातल्याचे समोर आले आहे. कर्जाच्या पोटी ठेवी स्वीकारून तसेच मुदत संपलेल्या ठेवीदारांना ठेवीचे पैसे परत करण्याची वेळ आली असता ठेवीदारांना शस्त्रधारी बाऊन्सर कडून दमदाटी दाखवण्याचे प्रकार या क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन व संचालकाकडून केले जात असता यावेळी समस्त  ठेवीदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्याकडे धाव घेतली असता जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोर्ले व प्रसाद पाटील यांनी साई दर्शन क्रेडिट सोसायटी यांच्याकडे पोलिसांसह गोरगरीब माता भगिनी यांचे ठेवीचे पैसे परत करणे विषयी विचारणा केली असता देशमुख यांच्याकडून उद्धट स्वरूपाची, दमदाटीची  उत्तरे देत त्यांच्याशी जाणीवपूर्वक वादविवाद वाढवून पैसे देण्याविषयी  टाळाटाळ केली. यावेळी संतप्त जमावाने रोशन जाऊन  देशमुख यांना चांगला धडा शिकवला.

याउलट "चोर सोडून संन्याशाला फाशी"अशी काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली पैसे घेणारा देशमुख मोकाटपणे फिरत आहे व जनतेच्या हितासाठी, गोरगरिबांसाठी लढणारे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व प्रसाद पाटील आज खंडणी व दरोडा तसेच जातीवाचक अशा पद्धतीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अटकेत आहेत.

            

  आज समस्त ठेवीदारांनी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत  देशमुख यांच्याविरुद्ध निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करून देखील साई दर्शन सोसायटीचे चेअरमन शुभम देशमुख यांना पोलिसांनी अटक केली नसल्याचे निदर्शनास येत आहे. यावरून फिर्यादी व पोलीस यांच्यात संगणमत झाले असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.


साई दर्शन जनता क्रेडिट सोसायटी प्रकरणी पोलीस प्रशासनाचा सामान्य जनतेवर अन्याय