मनोरंजन

सलमान खानचं ट्रोलर्सना सणसणीत उत्तर – 'रश्मिकाच्या मुलीसोबतही काम करेन!'

Salman Khans hilarious reply to trolls


By nisha patil - 3/24/2025 8:17:24 PM
Share This News:



सलमान खानचं ट्रोलर्सना सणसणीत उत्तर – 'रश्मिकाच्या मुलीसोबतही काम करेन!'

सलमान खानचा आगामी चित्रपट 'सिकंदर' सध्या चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, भाईजानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. मात्र, सलमान (59) आणि रश्मिका (28) यांच्यातील 31 वर्षांच्या वयाच्या फरकावर ट्रोलर्सनी सोशल मीडियावर चर्चा सुरू केली. यावर सलमानने त्याच्या स्टाइलमध्ये उत्तर देत म्हणलं –

"रश्मिका आणि माझ्यात ३१ वर्षांचा फरक आहे. पण तिला काही अडचण नाही, तिच्या वडिलांनाही अडचण नाही, मग तुम्हाला का आहे?"

त्याच्या या उत्तराने चर्चेला अधिक रंग चढला. एवढंच नाही, तर "रश्मिकाच्या लग्नानंतर तिच्या मुलीसोबतही मी काम करेन!" असं वक्तव्य करून त्याने ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिलं. या वक्तव्यावर रश्मिका मंदानाही व्यासपीठावर मनसोक्त हसताना दिसली.

ईदच्या निमित्ताने 'सिकंदर' होणार प्रदर्शित
ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' या चित्रपटात सलमान आणि रश्मिकासह काजल अग्रवाल, सत्यराज आणि शर्मन जोशी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट ईद 2025 ला थिएटरमध्ये झळकणार आहे.


सलमान खानचं ट्रोलर्सना सणसणीत उत्तर – 'रश्मिकाच्या मुलीसोबतही काम करेन!'
Total Views: 26