बातम्या

'समाजभान समूह'ने दिव्यांग आणि विशेष गरजाधिष्ठित मुलांना समजून घेत दिला मदतीचा हात..

Samajbhan Group understood


By Administrator - 11/12/2024 4:48:57 PM
Share This News:



 'समाजभान समूह'ने दिव्यांग आणि विशेष  गरजाधिष्ठित मुलांना समजून घेत दिला मदतीचा हात..
 

मलकापूर प्रतिनिधी  'स्वयम' विशेष मुलांची शाळा, न्याय नगरी, जिल्हा न्यायालय इमारतीमागे, कसबा बावडा, कोल्हापूर येथे  आज रविवार दि. ८ डिसेंबर, २०२४ रोजी समाजभान समूहातील सदस्यांनी भेट दिली.संवेदनशील गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार साहेब यांच्या पुढाकाराने आणि समाजभान परिवारातील संवेदनशील शिक्षक यांच्या साथीने समाजभान चळवळ सुरू आहे..

समाजातील वंचित घटकासाठीडॉक्टर विश्वास सुतार यांच्या मार्गदर्शनाखालीआतापर्यंत ४० वंचित घटकांना समाजभान चळवळीमार्फत मदत  केली आहे.आज 'स्वयम' या विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शाळेला भेट देऊन त्या मुलांना समजून घेण्याचा समाजभान सदस्यांनी प्रयत्न केला. यावेळी विशेष गरजा असलेल्या मुलांनी सादर केलेले उपक्रम पाहून मन भरून आले.

यावेळी विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. समाजभान समूहातर्फे छोटीसी भेट स्वयम शाळेचे मुख्याध्यापक श्री.भिसे सर यांच्याकडे सुपूर्दद करण्यात आली. यावेळी प्रभाकर हेरवाडे, कृष्णात कारंडे,लक्ष्मी पाटील, डॉ.संजय जगताप, बाजीराव पाटील ,भगवान कणसे, नाकाडे सर,भिसे मॅडम कोराणे मॅडम, सुनील अस्वले,योजना खैरे ,विनायक सुतार यांच्यासह समाजभान समूहाचे सदस्य उपस्थित होते.


'समाजभान समूह'ने दिव्यांग आणि विशेष गरजाधिष्ठित मुलांना समजून घेत दिला मदतीचा हात..