बातम्या

स्व.राजे साहेब यांचे विचार पुढे नेऊन त्यांचे स्वप्न साकार करूया* *राजे समरजितसिंह घाटगे

Samarjitsih ghatge


By nisha patil - 7/28/2024 9:10:26 PM
Share This News:



*स्व.राजे साहेब यांचे विचार पुढे नेऊन त्यांचे  स्वप्न साकार करूया*


*राजे समरजितसिंह घाटगे*

*कारखाना कार्यस्थळावर स्व.घाटगे यांना ७६व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम....*

कागल, प्रतिनिधी. शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी  शेतकरी व सर्वसामान्य माणूस याना केंद्रस्थानी ठेवून स्वच्छ,पारदर्शक व समाजभीमुख कारभार  केला. आपल्या आदर्श विचारातून  शाश्वत  कार्य केले.  त्यांची ही विचारधारा  मर्यादित न ठेवता  पुढे नेऊन त्यांचे स्वप्न साकार करूया.असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

स्व.घाटगे यांच्या जयंतीनिमित्त येथे कारखाना कार्यस्थळावर कारखाना सेवेतून गतवर्षभरातील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सपत्नीक सत्कार सोहळ्यावेळी ते बोलत होते.

तत्पुर्वीश्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे  यांच्या ७६ व्या जयंती निमित्त कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या  पुतळ्यास  अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कारखाना प्रांगणातील राजर्षि  छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण केला.

यावेळी माजी खासदार संजय मंडलिक,माजी आमदार अमल महाडिक,कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे,सुरेश कुराडे,सर्व संचालक,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
   .घाटगे पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांची विचारधारा स्व.राजेसाहेब यांनी श्री शाहू ग्रुप मध्ये आणली. त्यामुळेच शाहू ग्रुप देशात आदर्श ठरला. नुकताच 70 व्या पुरस्काराने देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून कारखान्याचा सन्मान झालेला आहे.स्व.राजे यांचे  हेच विचार पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे त्यासाठी सर्वांनी साथ द्या.

यावेळी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले. कारखाना साईट येथे  वृक्षारोपण केले.तसेच श्रीराम मंदिर येथे महाआरतीही करण्यात आली.दिवसभर  जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक व शेतकरी,रजेप्रेमी यांची कारखाना कार्यस्थळी स्व.घाटगे  यांना अभिवादन करण्यासाठी रीघ लावली होती.
 

यावेळी शशिकांत खोत,भरत पाटील,अभिषेक पाटील,राजेंद्र तारळे,प्रीतम कापसे यांच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी,सभासद,शेतकरी, कार्यकर्ते,कर्मचारी उपस्थित होते.


स्व.राजे साहेब यांचे विचार पुढे नेऊन त्यांचे स्वप्न साकार करूया* *राजे समरजितसिंह घाटगे