बातम्या

राजे समरजीतसिंह यांचे अनोखे रक्षाबंधन

Samarjitsih ghatgea


By nisha patil - 8/20/2024 10:53:38 AM
Share This News:



"रक्षाबंधन " बहिण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतिक असलेला  हिंदू सण.या सणाच्या निमित्ताने  हिंदू परंपरेप्रमाणे कागलमधील  महिला भगिनींच्या थेट  घरी जाऊन,राजे  समरर्जीतसिंह घाटगे यांनी वेगळ्या पद्धतीप्रमाणे हा सण साजरा केला. राजेसाहेब यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमास महिला भगिनींच्या कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विशेष म्हणजे, गोसावी समाजातील  भंगार गोळा करणाऱ्या  अनेक महिलां तसेच मुजावर गल्ली नजीकच्या रुकसाना जमादार व शाकीरा जमादार या मुस्लिम कुटुंबातील महिला राजें दारात येताच उत्स्फूर्तपणे राजेंना राखी बांधण्यासाठी पुढे आल्या.
या उपक्रमाबाबत बोलताना श्री घाटगे म्हणाले,  शासकीय योजनेचा  लाभ मिळालेल्या अनेक लाभार्थी महिलांनी मला माझ्या घरी येऊन राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यापेक्षा मला वाटले, आपणच त्यांच्या घरी गेलो तर सर्व भगिनींच्या दृष्टीने ते सोयीचे होईल. म्हणूनच  आम्ही त्यांच्या घरी जाऊन हा सण  त्यांच्यासोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. कागल शहरात महिला कडून मिळालेला प्रतिसाद व प्रेम पाहून खूप भारावून गेलो असून, समाजसेवेबरोबर सर्व भगिनिंच्या सर्वांगिण सुरक्षेसाठी मी कटिबद्ध राहणार आहे.
 

कागल,गडहिंग्लज- उत्तूर विभागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासह त्यांच्या प्रत्येक अडचणीत बंधू प्रेमाच्या नात्यातून त्यांच्यासोबत राहणे हा माझा राजधर्म आहे.असे सांगून ते म्हणाले,  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिले दोन महिन्याचे अनुदान राजे बँके मार्फत घरपोच देणार आहोत,  या योजनेचा लाभ महिलांना देत असताना त्यांच्यावर उपकाराची भावना कोणीही ठेवू नये ते लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. कार्यकर्त्यांनी अजूनही काही महिला  या योजनेपासून वंचित राहिल्या असल्यास त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.


राजे समरजीतसिंह यांचे अनोखे रक्षाबंधन