बातम्या

"समरजीतसिंह आपल्या दारी".योजना आम्ही राबवली हाच त्यांच्या व आमच्यातील फरक....

Samarjitsingh Apna Dari


By nisha patil - 1/11/2024 9:59:43 PM
Share This News:



उत्तूर प्रतिनिधी छोट्या मोठ्या कामासाठी व शासकीय योजनेच्या लाभासाठी सकाळी सहा वाजले पासून पालक मंत्र्याच्या दरबारात रांगा लावाव्या लागतात हेच मोठे दुर्भाग्य आहे अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ  यांच्यावर कागल गडहिंग्लज उत्तूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे  यांनी केली.हालेवाडी (ताआजरा) येथे झालेल्या प्रचार बैठकीत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मी तर म्हणतो शासकीय योजनेचा लाभ हा लाभार्थ्याला मिळालाच पाहिजे त्यासाठी सहा वाजता लोकप्रतिनिधीच्या दारात उभा राहायची गरजच काय? त्यातील नवा प्रयोग म्हणून आम्ही समरजीत सिंह आपल्या दारी हा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत आम्ही कोणत्याही मध्यस्थशिवाय थेट नागरिकांच्या दारात जाऊन  विविध योजनांचे लाभ दिले.या अभिनव उपक्रमाची चर्चा राज्यभर झाली. येत्या काळात आम्हाला असेच काम करायचे आहे. जनतेला आणि लाभार्थ्याला वेटीला धरणे हे आमच्या संस्कारात नाही.
 

कागल विधानसभा मतदारसंघात उत्तूर  विभागात समावेश झाल्यानंतर  हा विभाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत या विभागासाठी जास्तीत जास्त वेळ दिला. शासन आपल्या दारी तसेच विविध उपक्रम व विकास कामासाठीच्या निधीचा पहिला मान उत्तूर विभागालाच दिला.  छ शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानमधील संपूर्ण रयत कुटुंब मानून काम केले. त्यांचाच वारसा चालविताना कागल गडहिंग्लज उत्तूर  विभाग कुटुंब मानून या विभागातील जनतेच्या सुखदुःखाशी समरस झालो. आपल्या कुटुंबातील सदस्याला यावेळी आमदार म्हणून सेवा करण्याची संधी द्या. या विभागाचे नंदनवन केल्याशिवाय मी थांबणार नाही.

यावेळी प्रकाश कृष्णा येजरे, मधुकर पाटील, धनाजी खवरे,सुरेश पाटील, तुकाराम येजरे, प्रकाश पाटील, मधुकर पाटील, वसंत येजरे वैशाली येजरे,मयुरी येसादे,संदीप पन्हाळकर, दशरथ कांबळे,रणजीत कांबळे आदी उपस्थित होते.
सुनील सुतार यांनी स्वागत केले.दीपक येसादे यांनी आभार मानले.

 

 पालकमंत्र्यांनी तरुणांची एक पिढी बरबाद केली 

निवडणुका आल्या की तरुणांना अमिष दाखवायचे?
तूटपुंज्या पगारावर रोजंदारी वर कामावर घ्यायचे? या तरुणांच्या भविष्याचा विचार पालकमंत्र्यांनी कधी केला काय?मर्जीतील चार ठेकेदारांना सांभाळण्यासाठी रस्ते व गटर्स याव्यतिरिक्त  काही केले का? तरुणांच्या हाताला काम मिळावे? बेरोजगारी दूर व्हावी? यासाठी काय केले? रस्ते आणि गटारी याही पेक्षा अनेक कामे आहेत.आजमोठ्या संख्येने सुशिक्षित तरुण आहेत जे बेरोजगार आहेत या तरुणांच्या भवितव्याच्या दृष्टीने कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात विभागवाईज अभ्यासिका, वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा तरुणाईच्या हिताच्या गोष्टी  का केल्या नाहीत?
युवा पिढीचा राजकारणासाठी वापर करून निवडणूक काळात  अमिष दाखवून ,पैसे देऊन आपल्या पाठीमागून फिरविले. त्यामुळे तरुणांची एक पिढी बरबाद झाली ही सामाजिक हानी कशी भरून निघणार? 

 चौकट
आबेओहोळ प्रकल्प का 
रखडला

 रखडलेला आंबेओहोळ धरण प्रकल्पासाठी आम्ही 227 कोटीचा निधी मंजूर करून आणला त्यामुळेच या धरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. हे सर्व या विभागातील जनता जाणते. पालकमंत्री त्यांच्या सवयीप्रमाणे गाजावाजा करतात हा प्रकल्प आम्ही पूर्ण केला मग पंधरा वर्षे हा का रखडला होता?


"समरजीतसिंह आपल्या दारी".योजना आम्ही राबवली हाच त्यांच्या व आमच्यातील फरक....