बातम्या

समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

Samarjitsinh Ghatges birthday was celebrated


By nisha patil - 1/19/2025 10:26:05 PM
Share This News:



समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

आरोग्य तपासणी,रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धांचे आयोजन
कागल, दि. १९ : शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळा, अंगणवाडी, मूकबधिर शाळा, वृद्धाश्रम येथे खाऊ, शालेय साहित्य आणि भोजन वाटप तसेच कागल व मुरगुडमध्ये रुग्णांना फळे वाटप केली गेली.

श्रीराम मंदिरात महाआरती पार पडली, तर चित्रकला स्पर्धेस ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मोफत डोळे तपासणी शिबिरात १५० रुग्णांची तपासणी झाली आणि ७० जणांनी रक्तदान केले. घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले, तसेच पीएम विश्वकर्मा ई-श्रम व आभा कार्डाच्या मोफत नोंदणी कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळाला.

राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन, राजमाता जिजाऊ महिला समिती आणि विविध संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
Total Views: 38