बातम्या

पालक मंत्र्यांकडून मराठा समाजाची घोर फसवणूक समरजितसिंह घाटगे

Samrjitsih ghatge


By nisha patil - 10/23/2024 7:33:04 PM
Share This News:



कागल,प्रतिनिधी. मराठा भवन बांधकामाचा मोठा गाजावाजा करत दोन वेळा भूमिपूजनाचे नारळ फोडले. निधी येऊनही पण मराठा समाजाच्या अस्मितेचे मराठा भवन न बांधता पालकमंत्र्यानी मराठा समाजाची घोर फसवणूक केली. अशी घनाघाती टीका शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केली

    

करनुर (ता.कागल)येथील आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी सरपंच आनंदराव पाटील होते. 

     

 घाटगे पुढे म्हणाले," पंचवीस वर्षे आमदार, मंत्री असतांना मुश्रीफांनी आपल्या भाषणातून शाळा बांधण्यासाठी किती निधी आणला हे कधी सांगितले नाही. कारण त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टदारांना शाळा बांधकामाचा निधीमध्ये स्वारश नाही. म्हणून निधी आणलाच नाही. पंचवीस वर्षात त्यांनी किती नवीन शाळा बांधल्या.? किती शाळांचे वर्ग डिजिटल झालेत? मंत्री महोदयांकडे गावातील सर्वसामान्य माणूस काम घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्या गावातील त्यांच्या कार्यकर्त्याला किंवा लाडक्या कॉन्टॅक्टरला विचारल्याशिवाय त्या माणसाचे काम केले नाही.त्यांना न विचारता काम केल्याचे दाखवा समरजितसिंह घाटगे राजकारण सोडेल.

    

  व्यासपीठावर शाहूचे संचालक युवराज पाटील, विक्रमसिंह घाटगे (वंदुरकर), कुमार पाटील, तानाजी शिंदे, कविता घाटगे, कृष्णात धनगर आदी उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी,राष्ट्रीय काँग्रेसचे सागर कोंडेकर,उत्तम पाचगावे यांनीही मनोगत व्यक्त केले. सतीश धनगर स्वागत यांनी केले.जयसिंग घाटगे यांनी आभार मानले.

 

 

माझा लाडका पी.ए.सरपंच होणार नाही.....

 

            घाटगे यावेळी म्हणाले, प्रत्येक घरामध्ये,भावकीमध्ये भांडण लावणारे पालकमंत्री नैतिकतेच्या आज गप्पा मारत आहेत.तालुक्यातील शाळा ,आरोग्यासाठी किती निधी आणला याची वाच्यता कधीही पालकमंत्र्यांनी केली नाही.करण हा निधी त्यांच्या लाडक्या कंत्राटदारांना आवडत नाही. .माझा लाडका कंत्राटदार,लाडका पी.ए.लाडका सरपंच कोणीही होणार नाही.तर गावागावातील सर्वसामान्य माझे कार्यकर्तेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला सर्वस्व माणून सरपंच होतील.

 

 

 रामकृष्ण नगरमधील नागरिकांना प्राॕपर्टी कार्डे देणार ....

करनूर ग्रामस्थांचे आणि स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांचे ऋणानुबंध अतुट होते.या भावनेतूनच चाळीस वर्षापूर्वी त्यांनी येथे रामकृष्ण नगर वसवले.मात्र या जागा लोकांच्या नावावर नाहीत.पंचवीस वर्ष सत्ता असूनही त्यांना प्राॅपर्टी कार्डे अजुनही दिलेली नाहीत.पण त्यांच्या लाडक्या कंत्राटदारांची घरे साहेबांच्या घरापेक्षा मोठी आहेत. एकवेळ आमदारकीची संधी द्या,माझ्या वडीलांनी वसविलेल्या रामकृष्ण नगरमधील लोकांची प्राॅपर्टी कार्डे करुन त्यांच्या घरे नावावर करतो. 

 


पालक मंत्र्यांकडून मराठा समाजाची घोर फसवणूक समरजितसिंह घाटगे