बातम्या
संयुक्ता जाधवचा ११,००० किमी बाईक प्रवास – महिला सुरक्षिततेचा जागर!
By nisha patil - 7/2/2025 7:45:25 PM
Share This News:
संयुक्ता जाधवचा ११,००० किमी बाईक प्रवास – महिला सुरक्षिततेचा जागर!
कोल्हापूर: "प्रवास एकट्या नारीचा, होऊदे सुखाचा" या घोषवाक्याने कोल्हापूरच्या संयुक्ता जाधव भारत भ्रमंतीसाठी सज्ज झाल्या आहेत. कोल्हापूर-काश्मीर-कलकत्ता-कन्याकुमारी (K4) असा ११,००० किमी चा प्रवास त्या बाईकवरून एकट्याने पूर्ण करणार आहेत. महिला सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी त्या ४५ दिवसांचा हा प्रवास करणार असून, इतक्या लांबचा प्रवास करणाऱ्या त्या कोल्हापूरच्या पहिल्या महिला रायडर ठरणार आहेत.
प्रवासाचा शुभारंभ
संयुक्ता जाधव यांच्या या ऐतिहासिक प्रवासाचा फ्लॅग-ऑफ सोहळा ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत शाहूपुरी जिमखाना, शिवाजी पार्क येथे होणार आहे.
दररोज प्रवासाचे अपडेट्स
त्यांच्या या मोहिमेचे अपडेट्स Facebook, Instagram आणि YouTube वर पाहता येणार आहेत. त्यांच्या या प्रवासातून महिला सुरक्षिततेसह आत्मनिर्भरतेचा संदेश देशभर पोहोचणार आहे.
संयुक्ता जाधवचा ११,००० किमी बाईक प्रवास – महिला सुरक्षिततेचा जागर!
|