शैक्षणिक
डॉ. संजय डी. पाटील यांना 'सी.एस.आर. हिरो' पुरस्कार
By nisha patil - 4/2/2025 11:57:21 PM
Share This News:
डॉ. संजय डी. पाटील यांना 'सी.एस.आर. हिरो' पुरस्कार
कसबा बावडा/वार्ताहर: डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 'सी.एस.आर. हिरो' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवभारत ग्रुपच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला. या समारंभात नवभारतचे अध्यक्ष रामगोपाल माहेश्वरी, बजाज फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर बजाज आणि मेघाश्रयच्या संस्थापिका सीमा सिंग यांची उपस्थिती होती.
या पुरस्कारामुळे डॉ. पाटील यांना आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. ते म्हणाले, "विद्यार्थी केंद्रबिंदू मानून उत्कृष्ट शिक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि आमच्या सर्व संस्थांमधून सर्वोत्तम विद्यार्थी घडवण्याचे कार्य सुरू ठेवू."
डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली, डी. वाय. पाटील ग्रुपने गेल्या 40 वर्षात राज्याच्या ग्रामीण भागात उच्च शिक्षण पोहोचवले आहे, तसेच हजारो गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध केले आहेत.
डॉ. संजय डी. पाटील यांना 'सी.एस.आर. हिरो' पुरस्कार
|