बातम्या

संजय मंडलिक पुन्हा आपली ताकद दाखवण्यात उत्सुक...

Sanjay Mandalik eager to show his strength again


By nisha patil - 6/7/2024 5:36:10 PM
Share This News:



 लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले संजय मंडलिक यांनी पुन्हा आपली ताकद दाखवून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हमिदवाडा कारखाना येथे सभासद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेत 'मंडलिकांना वगळून कोणी आमदार होऊ शकत नाही', असा अप्रत्यक्ष इशारा संजय मंडलिक यांनी कागलमधील महायुतीच्या नेत्यांना दिला.राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर केलेले विधान सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात मंडलिक गटाची ताकद आहे. आमच्या मंडलिक गटाला बेदखल करून चालणार नाही. आमच्या गटाकडे दुर्लक्ष करून कोणालाच आमदार होता येणार नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.' अशा शब्दात माजी खासदार संजय मंडलिक Sanjay Mandalik यांनी इशारा दिला आहे


संजय मंडलिक पुन्हा आपली ताकद दाखवण्यात उत्सुक...