बातम्या

संतोष देशमुख हत्याप्रकरण: वाल्मिक कराडने सीआयडीला शरणागती पत्करली, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल

Santosh Deshmukh murder case


By nisha patil - 12/31/2024 10:43:02 PM
Share This News:



संतोष देशमुख हत्याप्रकरण: वाल्मिक कराडने सीआयडीला शरणागती पत्करली, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल

बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात नाव आलेल्या वाल्मिक कराडने अखेर पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली आहे. यापूर्वी तब्बल 23 दिवस पोलिसांना गुंगारा देत राहिलेल्या कराडने शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवत, आपल्यावरील आरोप हे राजकीय सुडातून करण्यात आल्याचा दावा केला.

कराड म्हणाले, "मी खंडणीप्रकरणात आरोपी आहे, मात्र हत्येच्या गुन्ह्याशी माझा काहीही संबंध नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे." त्यांनी MH.23.BG.2231 या खासगी स्कॉर्पिओ गाडीतून सीआयडी कार्यालयात हजेरी लावली.

या घटनेवरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कराडला माध्यमांसमोर बोलण्याची संधी कशी मिळाली? त्याला खासगी गाडीतून येऊ दिल्याचे कारण काय? अशा मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कराडच्या विरोधात कठोर पावले उचलली असली तरी, आता तपासाच्या पुढील दिशेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


संतोष देशमुख हत्याप्रकरण: वाल्मिक कराडने सीआयडीला शरणागती पत्करली, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल
Total Views: 37