शैक्षणिक
टेक्नोवा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना – सारंग जाधव
By nisha patil - 3/13/2025 11:55:38 PM
Share This News:
टेक्नोवा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना – सारंग जाधव
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजित "टेक्नोवा 2025" तांत्रिक स्पर्धेचे उद्घाटन सीआयआय दक्षिण महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष उद्योजक सारंग जाधव यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्ती, आत्मविश्वास आणि डिजिटल कौशल्यांच्या विकासावर भर देण्याचे महत्त्व सांगितले.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. गेल्या दहा वर्षांपासून घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत यंदा महाराष्ट्रभरातून 560 विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके व विभाग प्रमुख उपस्थित होते. समन्वयक धैर्यशील नाईक यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन समृद्धी मेटिल हिने केले.
टेक्नोवा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना – सारंग जाधव
|