बातम्या
कोल्हापूरच्या सरपेचात राष्ट्रपती पुरस्काराचा मानाचा तुरा
By nisha patil - 8/30/2024 3:50:54 PM
Share This News:
दर वर्षी कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालय - भारत सरकार यांच्या अंतर्गत घेण्यात येणारे व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकता विकासातील उत्कृष्टतेसाठी म्हणजे दीर्घकालीन आणि अल्प-मुदतीच्या प्रशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक , कौशल्य प्रशिक्षक आणि मास्टर ट्रेनर तसेच उद्योजकता विकासात, ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे . त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीचे परिणाम, इतरांना अनुकरण करण्यासाठी बेंचमार्क सेट करणाऱ्या विशिष्ट व्यक्तिंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देणाचा उद्देश असतो .
सन 2024 सालाकरिता देण्यात येणाऱ्या _ आय टी आय निदेशकांसाठीच्या राष्ट्रीय_ पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली यामध्ये आपल्या कोल्हापूरचे चित्रकार आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निदेशक
विवेक चंदालिया यांना यंदाचा 'नॅशनल टीचर्स अवॉर्ड ' मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
सदर पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक दिनाचे अवचित्य साधून ०५ सप्टेंबर २०२४ रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे
माननीय* राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत . आणि ०६ सप्टेंबर ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली येथे पुरस्कर्ते सोबत संवाद साधणार आहेत .
कोल्हापूरच्या सरपेचात राष्ट्रपती पुरस्काराचा मानाचा तुरा
|