बातम्या

आमदार सतेज पाटील: 'राधानगरीतील नवा संपर्क कार्यालय देशातील सर्वात प्रभावी'"

Satej patil radhangari


By nisha patil - 8/17/2024 9:37:23 PM
Share This News:



राधानगरी तालुक्यात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या नवनिर्मित संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कार्यालयाच्या कार्यक्षेत्राबद्दल उल्लेख करताना ते देशातील सर्वात प्रभावी कार्यालय असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कामे येथे केली जातील आणि सर्वसामान्यांशी ऋणानुबंध कायम ठेवणे आवश्यक आहे. आमदार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जोर देण्याची गरज व्यक्त केली आणि 2026 पर्यंत शंभर टक्के मुली शाळेत जातील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.


यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कार्यालयाच्या माध्यमातून 24 तास जनतेच्या संपर्कात राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमात जिल्हा बँक संचालक ए. वाय. पाटील, गोकुळचे संचालक आर. के. मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजय देवणे, आणि इतर मान्यवरांनी भाषणे केली. कार्यकमाच्या समारंभात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


आमदार सतेज पाटील: 'राधानगरीतील नवा संपर्क कार्यालय देशातील सर्वात प्रभावी'"