बातम्या

सौंदत्ती यात्रेच्या खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली: राजेश क्षीरसागर यांची माहिती

Saundatti Yatras Kholamba issue resolved


By nisha patil - 10/10/2024 7:56:11 PM
Share This News:



कोल्हापूर दि.१० : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. दरवर्षी या यात्रेस किमान दोनशे बसेस जातात. गेली अनेक वर्षे खोळंबा आकार व एस.टी.भाडे याबाबत भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यात येत होती. परंतु, सन २००९ पासून या विषयी आपण लक्ष घातले आणि खरोखरच एस.टी भाडे आणि खोळंबा आकार कमी करण्यात यशस्वी ठरलो. सौंदत्ती भाविकांची यात्रा सुखकर व्हावी यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून, आगामी मार्गशीष पौर्णिमा आणि चैत्र्य पौर्णिमा यात्रेसाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या एस.टी. बसेसचा खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली काढण्यात यश आले आहे. या यात्रेस विशेष सवलत देवू करून खोळंबा आकार प्रतितास नाममात्र १० रुपये यासह प्रत्यक्ष चालविल्या जाणाऱ्या कि.मी.प्रमानेच भाडे आकारण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

    यामध्ये पुढे म्हंटले आहे कि, यात्रेकरिता गेली ३० वर्षे श्री रेणुका देवीचे भक्त प्रासंगिक कराराद्वारे एस.टी. गाडीचा वापर करतात. याबाबत गेल्या दहा- बारा वर्षात सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे खोळंबा आकारासह भाडे आकारणी चा प्रश्न मार्गी लागत आहे. यावर्षीही खोळंबा आकाराचा व भाडे आकारणी प्रश्न निकाली काढू अशी ग्वाही रेणुका भक्त संघटनाना दिली होती.  याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून या यात्रेस विशेष सवलत देण्याची विनंती करण्यात आली होती. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली काढून  कोल्हापूर दौऱ्यावर आले. शासनाने दिलेल्या एस.टी. महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे सौंदती यात्रेसाठी ४५ आसन क्षमते पर्यंतच्या परिवर्तन बसेससाठी एकवेळची खासबाब म्हणून प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या कि.मी.साठी प्रती कि.मी.रुपये ५५/- प्रमाणे भाडे दर आकारणी व खोळंबा आकार रुपये १०/- प्रती तास बस आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सौंदत्ती भाविकांची यात्रा अधिक सुकर होणार आहे. सदर विशेष यात्रा सवलत २०२४ मधील मार्गशीष यात्रेसह २०२५ मधील चैत्र्य यात्रेकरिताही लागू राहणार आहे. खोळंबा आकाराचा प्रश्न मार्गी लावून भाविकांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानत असल्याचेही राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले आहे.
 


सौंदत्ती यात्रेच्या खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली: राजेश क्षीरसागर यांची माहिती