बातम्या

दुचाकीच्या अपघातात शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

School student dies in bike accident


By nisha patil - 1/31/2025 7:50:52 PM
Share This News:



शिरगाव येथील दहावीत शिकणारा अभिनव हा गाडीतील पेट्रोल आणण्यासाठी काल रात्री  मोटरसायकल वरून पुंगाव कडे निघाला होता. दरम्यान राशिवडे खुर्द  ते पुंगाव रोडवरील मठाचे शेत नावाच्या ठिकाणी मोटार सायकल आल्यावर तिथल्या मोरीच्या संरक्षक कठड्याला जोराची धडक बसली. यात अभिनव गाडीवरून दूर फेकला गेला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

अभिनव हा सरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूलमध्ये दहावी मध्ये शिकत होता. त्याच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, चुलते असा मोठा परिवार आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झालीय घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


दुचाकीच्या अपघातात शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू
Total Views: 44