बातम्या

'एआय' प्रणालीमुळे राज्यात दुसरी नीलक्रांती शक्य : नितेश राणे

Second Neelkranti possible


By nisha patil - 2/13/2025 6:27:06 PM
Share This News:



मत्स्य उत्पादन वाढीसाठी मच्छीमारांची सुरक्षा महत्त्वाची आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी नीलक्रांती शक्य असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंनी सांगितले. 

मंत्री राणे म्हणाले की, मत्स्यव्यवसाय विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या पारदर्शी अंमलबजावणीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल याचा आराखडा तयार करावा. आपत्तीच्या काळात राबवावयाची सुरक्षा व प्रतिसाद यंत्रणा यासाठी एआयचा वापर करावा अशा सुचना मंत्री राणे यांनी यावेळी दिल्या. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र प्रगत संशोधन आणि प्रगत कायद्यासाठी दक्षता अंमलबजावणीचे संचालक बी. व्ही. सत्यसाईकृष्णा आदी उपस्थित होते.


'एआय' प्रणालीमुळे राज्यात दुसरी नीलक्रांती शक्य : नितेश राणे
Total Views: 40