ताज्या बातम्या
कोल्हापुरात GBS चा दुसरा बळी
By nisha patil - 2/16/2025 2:41:04 PM
Share This News:
कोल्हापुरात GBS चा दुसरा बळी
कोल्हापूर जिल्ह्यात गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) आजारामुळे दुसरा मृत्यू झाला आहे. रेंदाळ ढोणेवाडी येथील एका वृद्ध व्यक्तीचा छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या या रुग्णालयात GBS बाधित पाच रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील मिरज येथेही GBS मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १४ वर्षीय मुलगा आणि ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील GBS आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.
GBS हा दुर्मिळ आजार असून, यात रुग्णाच्या प्रतिकारशक्ती प्रणालीमुळे मज्जासंस्था आणि स्नायूंवर परिणाम होतो. त्यामुळे कमजोरी, अंगातील संवेदना कमी होणे आणि इतर गंभीर लक्षणे दिसून येतात. आरोग्य विभागाने नागरिकांना या आजाराची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापुरात GBS चा दुसरा बळी
|