बातम्या
संत रविदास विकास फाउंडेशनच्या हातकणंगले तालुका अध्यक्षपदी चेतन माने यांची निवड
By nisha patil - 3/2/2025 5:06:40 PM
Share This News:
संत रविदास विकास फाउंडेशनच्या हातकणंगले तालुका अध्यक्षपदी चेतन माने यांची निवड
महिला व वंचितांसाठी सामाजिक कार्याचा संकल्प
प्रतिनिधी : रवी धुमाळे.. दत्तवाड संत रविदास विकास फाउंडेशन, महाराष्ट्र राज्याच्या हातकणंगले तालुका अध्यक्षपदी चेतन माने यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सुरेखाताई दिघे आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ता पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय जाहीर करण्यात आला.
यावेळी मा. दत्ता पवार म्हणाले की, चेतन माने यांच्या रूपाने हातकणंगले तालुक्याला नवीन नेतृत्व मिळाले आहे, जे स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करेल.
नियुक्तीप्रसंगी चेतन माने यांनी महिलांवरील अत्याचार, वृद्ध, अपंग, अंध आणि इतर वंचित घटकांसाठी पेन्शन योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजकल्याण विभागाच्या सर्व योजनांचा चर्मकार समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
"हातकणंगले तालुक्यातील चर्मकार समाजाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी प्रामाणिकपणे पार पाडेन," असे माने यांनी सांगितले. या निवडीच्या वेळी संघटनेचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत रविदास विकास फाउंडेशनच्या हातकणंगले तालुका अध्यक्षपदी चेतन माने यांची निवड
|