बातम्या

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा उत्साह युवा पिढीसाठी ऊर्जादायी समरजितसिंह घाटगे

Senior leader Sharad Chandra Pawar


By nisha patil - 12/12/2024 11:05:51 PM
Share This News:



ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा उत्साह युवा पिढीसाठी ऊर्जादायी

समरजितसिंह घाटगे
 
कागल मध्ये  विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा 

कागल,प्रतिनिधी देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब 84 वर्ष पूर्ण करून  85  व्या वर्षात प्रवेश करीत आहेत. या वयातही  त्यांचा राजकीय- सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रातील   उत्साह युवा पिढीसाठी ऊर्जादायी आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र  पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. कागल येथे शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

सुरुवातीस,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत 85  ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत केक कापून व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून साजरा केला.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. श्री घाटगे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना केकही भरविण्यात आला. या निमित्ताने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप केली.

 घाटगे पुढे म्हणाले,ज्येष्ठ नेते शरदचंद्र  पवारसाहेब व शाहू ग्रुपचे ऋणानुबंध स्वर्गीय विक्रमसिंह घाटगेसाहेब यांच्यापासून आहेत. सहकारातील आदर्श साखर कारखाना म्हणून ते शाहू साखर कारखान्याचा राज्यभर गौरवपूर्ण उल्लेख  करत असत.राज्याच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. सहकार,कला,क्रीडा,कृषी, साहित्य, विज्ञान ,शैक्षणिक यासह सर्वच क्षेत्रात त्यांचा असलेला अभ्यासपुर्ण व्यासंग सर्वांसाठी अनुकरणीय आहे.

  यावेळी कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी,राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे,सागर कोंडेकर, उद्योजक सुधाकर सुळकुडे,शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी स्वागत केले. शाहूचे संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.


ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा उत्साह युवा पिढीसाठी ऊर्जादायी समरजितसिंह घाटगे