मनोरंजन
मुंबईत अपघातांची मालिका सुरूच: ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला बीएसटी बसची जोरदार धडक
By nisha patil - 3/27/2025 4:36:18 PM
Share This News:
मुंबईत अपघातांची मालिका सुरूच: ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला बीएसटी बसची जोरदार धडक
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या कारला बीएसटी बसने धडक दिल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. 26 मार्च) जुहू परिसरात हा अपघात झाला.
अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याजवळून जात असलेल्या बीएसटी बस क्रमांक 231 ने ऐश्वर्या राय बच्चन यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने, अपघाताच्या वेळी कारमध्ये कोणीही नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र कारचे मोठे नुकसान झाले. बस चालक कारचे नुकसान पाहण्यासाठी खाली उतरला असता, बच्चन कुटुंबीयांच्या सुरक्षारक्षकाने त्याला कानशिलात लगावल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर बस चालकाने संताप व्यक्त करत पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी येताच बच्चन कुटुंबीयांच्या सुपरवायझर स्टाफने बस चालकाची माफी मागितली, आणि प्रकरण शांततेत मिटवण्यात आले. मात्र, या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. अपघाताशी संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबईत अपघातांची मालिका सुरूच: ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला बीएसटी बसची जोरदार धडक
|