बातम्या

कोल्हापूरच्या माजी गृह राज्यमंत्र्यांच्या पुतण्यावर गंभीर आरोप...

Serious allegations against the nephew


By nisha patil - 10/3/2025 3:55:22 PM
Share This News:



कोल्हापूरच्या माजी गृह राज्यमंत्र्यांच्या पुतण्यावर गंभीर आरोप...

राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतेज पाटील यांच्या पुतण्यावर ठाण्यातील एका उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
 

पृथ्वीराज पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तो सतेज पाटील यांचा पुतण्या आणि डी वाय पाटील यांचा नातू आहे. पृथ्वीराज पाटील याच्यावर ठाण्यातील कापूर बावडी परिसरात राहणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे.


कोल्हापूरच्या माजी गृह राज्यमंत्र्यांच्या पुतण्यावर गंभीर आरोप...
Total Views: 413