बातम्या

महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बेड्या

Shackles to the buffoon who cheats women


By nisha patil - 1/14/2025 1:06:43 PM
Share This News:



महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बेड्या
 घटस्फोटित महिलेवर केले अत्याचार : २५ महिलांची फसवणूक

विवाह संकेतस्थळावरुन ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवुन फसवणुक

 विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत घटस्फोटित महिलेवर अत्याचार करून तिच्याकडून १० लाख ९४ हजार रुपये उकळणाऱ्या पुण्यातील एका भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयिताने पंचवीसपेक्षा अधिक महिलांची फसवणूक केल्याचे ही चौकशीत उघडकीस आले आहे. संशयिताला जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय.

 विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत घटस्फोटित महिलेवर अत्याचार करून तिच्याकडून १० लाख ९४ हजार रुपये उकळणाऱ्या पुण्यातील एका भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिरोज निजाम शेख असे आरोपीचे नाव आहे. संशयिताने पंचवीसपेक्षा अधिक महिलांची फसवणूक केल्याचेही चौकशीत निष्पन्न झालंय. विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत त्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून या भामट्याने ३२ वर्षीय घटस्फोटित महिलेवर वेगवेगळ्या लॉजवर नेऊन अत्याचार केले. 

याशिवाय तिच्याकडून ११ तोळे सोन्याचे दागिने व १ लाख ६९ हजार रुपये रोख असे १० लाख ९४ हजार रुपये उकळून फसवणूक केलीय. आपण उच्च शिक्षित व इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे, तसेच विविध पाच कंपन्यांची एजन्सीही नावावर असल्याचा त्याने बनाव केला होता. पीडीत महिलेला बदनामी करण्याची ही त्याने धमकी दिली. पीडित महिलेने हा सर्व प्रकार शनिवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात येऊन सांगितला व फिर्याद दाखल केली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनेची दखल घेत निरीक्षक कळमकर यांनी विशेष पथके पुण्याला रवाना करून संशयिताच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या.


महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बेड्या
Total Views: 58