बातम्या

जनहितासासाठी संपर्क कार्यालय उपयुक्त ठरेल* *खासदार शाहू छत्रपती

Shahu chatrpati


By nisha patil - 11/9/2024 11:32:26 PM
Share This News:



*कोल्हापूर :* सोयीसाठी आणि थेट संपर्कासाठी भुदरगड संपर्क कार्यालय सुरू केले. याचा जनहितासाठी आणि विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित उपयोग होईल. आम्हीलोकसभा निवडणुकीत जनतेला दिलेली वचनपूर्ती करण्यास कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी केले.गारगोटी येथील पिसे पेट्रोल पंपासमोरील सयाजी ट्रेड सेंटरमध्ये सुरु करण्यात आलेल्या भुदरगड तालुका संपर्क कार्यालय उद्धघाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, के. पी. पाटील प्रमुख उपस्थित होते.  माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घघाटन झाले.


खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांचा कार्यालय सुरु केल्याबद्दल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांच्या हस्ते सत्कार झाला.  खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले की, संपर्क कार्यालयात अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कामांची पूर्तता होण्यासाठी कार्यालयाचा सर्वांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा.

आमदार सतेज पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूक प्रचारावेळी शाहू महाराज यांचा लोकांशी संपर्क होणार का असा आरोप होत होता? मात्र आम्ही तालुका संपर्क कार्यालय  सुरू करू असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता केली आहे. गारगोटीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकर उभा करण्यासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर लगेच कामाला प्रत्यक्ष सुरुवात करूया.

यावेळी शिवसेना नेते विजयराव देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई, 'बिद्री' चे माजी संचालक प्रकाश देसाई, आर. व्ही. देसाई, समन्वयक सचिन घोरपडे, जीवन पाटील, सरपंच प्रकाश वास्कर, राजू काझी, संजय सरदेसाई, विनोद कांबळे, भुजंगराव मगदूम, शंभूराजे देसाई, विश्वजीत जाधव, प्रकाश पाटील, सम्राट मोरे, मछिंद्र मुगडे, संतोष मेंगाणे, मोहन शिंदे, अविनाश शिंदे, अमर बरकाळे यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


जनहितासासाठी संपर्क कार्यालय उपयुक्त ठरेल* *खासदार शाहू छत्रपती