बातम्या

बेकायदेशीर रक्कम जप्त – शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूरची मोठी कारवाई

Shahupuri police


By nisha patil - 12/29/2024 11:46:18 PM
Share This News:



बेकायदेशीर रक्कम जप्त – शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूरची मोठी कारवाई

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या आदेशानुसार तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी . अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याने विशेष रात्र गस्तीदरम्यान मोठी कारवाई केली आहे.

 

दिनांक 27/12/2024 रोजी रात्री 10:15 वाजता, नागाळा पार्क, कोल्हापूर येथील पाटलाचा वाडा हॉटेलच्या मागे संशयास्पद स्थितीत मारुती ब्रिजा कार (क्रमांक KA-51-ML-4552) आढळली. तपासादरम्यान इसम किरण हणमंत पवार (रा. देवापूर, ता. माण, जि. सातारा) आणि त्याचा साथीदार आण्णा सुभाष खडतरे (रा. खडतरे गल्ली, सांगोला, जि. सोलापूर) यांच्याकडे बेकायदेशीरपणे ₹1,98,99,500/- रोख रक्कम सापडली.

 

सदर रक्कमेबाबत अधिक चौकशी करता, त्यांनी कोणतेही वैध कागदपत्र सादर न केल्यामुळे सदर रक्कम बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ आयकर विभागाचे अधिकारी अमोल पंढरपुरकर (आयकर निरीक्षक) व विनयकुमार दुबे यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी शासकीय पंचांसमोर ही रक्कम जप्त केली.

 

सदर प्रकरणात पुढील कारवाई आयकर विभागाच्या वतीने सुरू आहे.

 

ही महत्त्वाची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत, मा. अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके व त्यांच्या पथकाने केली. पथकात सपोनि विशाल मुळे, श्रेणी पोसई संजीव बंबरगेकर, पोहेकॉ तानाजी चौगले, दयानंद पाटील, पोना चंद्रशेखर बांटुगे, पोकों दिनकर कुंभार, रत्नदिप जाधव व महिला पोलीस ऋतूजा सावंत यांचा समावेश होता.

कोल्हापूर पोलिसांचे हे यश प्रशंसनीय असून त्यांनी बेकायदेशीर व्यवहारांवर कारवाईसाठी घेतलेली ठोस भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे.


बेकायदेशीर रक्कम जप्त – शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूरची मोठी कारवाई
Total Views: 25