बातम्या

शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा शक्तिपीठ महामार्ग.

Shaktipeeth highway causing trouble to farmers


By nisha patil - 2/20/2025 6:37:04 PM
Share This News:



शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा शक्तिपीठ महामार्ग.

कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ देणार नाही शेतकऱ्यांचा निर्धार 

शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा मार्ग आहे. या महामार्गाची सध्या गरज नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. कंत्राटदार लॉबीला पाळण्यासाठी त्यांचं भलं करण्यासाठी या महामार्गाचा घाट घातला असून कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग करू देणार नाही असा निर्धार शक्तीपीठ महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलाय.आज कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग  १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक आ.सतेज  पाटील, समन्वयक गिरीश फोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, कोणाचा तरी माल खपवण्यासाठी नवीन प्रोजेक्ट निर्माण करायचा हा सरकारचा घाट आहे. शेतकऱ्यांचा आयुष्य उध्वस्त करणारा हा रस्ता आहे. गाफील राहुल चालणार नाही. मिठाचा खडा टाकून बघायचा आणि वातावरण निर्मिती करून मार्ग होतो काही बघायचं सध्या सरकारचं काम सुरू आहे. 12 तारखेला आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार. यावेळी शेतकऱ्यांची ताकद दाखवूया.मोर्चाचं आमदार खासदार यांनाही निमंत्रण द्या. येत्या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी म्हणून प्रखरतेने विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

तर शिवसेनेचे संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी शक्तीपीठ महामार्ग म्हणजे " घरातील गाय काढून कसायला देण्याचा प्रकार आहे.कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला परिसरात फिरकू देणार नाही.परिणामी राजकीय ताकत ही आजमावू, कोल्हापूर जिह्यातील लोकही इतर जिल्ह्यांच्या पाठीमागे आहेत. असं वक्तव्य केलं. 

तर जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून लातूरचे गजेंद्र केळकर, सोलापूरचे विजयकुमार पाटील व गणेश घोडके, धाराशिव चे सुदर्शन पडवळ, परभणीचे शांती भूषण कच्छवे, कचरू मुधोळ, हिंगोली चे सुरज माळेवार, सांगलीचे घनश्याम नलावडे व उमेश एडके, धाराशिव चेसंभाजी फडताडे यांची भाषणे झाली.

बैठकीच्या शेवटी शक्तीपीठ महामार्ग विरोधात लढा देण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. व सर्वानुमते महामार्गाविरोधात एकजुटीचा निर्धार करण्यात आला.

या बैठकी प्रसंगी , आमदार सतेज पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख विजय देवने, गिरीश फोंडे, प्रकाश पाटील, यांच्यासह १२ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित.


शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा शक्तिपीठ महामार्ग.
Total Views: 36