बातम्या
"शिंदेंची ग्वाही: 'लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, दोन हजार रुपये मिळणार'"
By nisha patil - 10/22/2024 6:49:16 PM
Share This News:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी बहीण योजना'बाबत मुक्ताईनगर येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात महत्त्वाचं विधान केलं. त्यांनी स्पष्ट केलं की, आचारसंहिता लागू झाल्यानंतर विरोधक या योजनेला अडथळा आणू शकतात, म्हणूनच सरकारने आधीच पाच हप्ते महिलांच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत. शिंदेंनी हेही आश्वासन दिलं की, सरकार पुनः सत्तेत आल्यानंतर महिलांना दीड हजारऐवजी दोन हजार रुपये दिले जातील. यासह, शिंदे यांनी सरकारचं लोकाभिमुख धोरण ठळकपणे मांडलं आणि आपल्याला "सीएम नाही, तर कॉमन मॅन" म्हणून संबोधलं.
"शिंदेंची ग्वाही: 'लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, दोन हजार रुपये मिळणार'"
|